Call: (0253) - 2311417 | Email: mswcollege.nashik@gmail.com

Maratha Vidya Prasarak Samaj's

College of Social Work

 M.V.P. Campus, Gangapur Road, Nashik-422002. (Est.1993)

 "Affiliated with Savitribai Phule Pune University  |  Recognized by UGC & NAAC Accredited"

MSW Information Brochure 2024  |  CET Application Form 2024  |  CET 2024 Programme Scheduled

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक सप्ताह आवश्यक– मा. ॲड. लक्ष्मण लांडगे


मविप्र समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयात दिनांक 27.01.2025 रोजी सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले म .
वि. प्र .संस्थेचे शहर संचालक मा. ॲड. लक्ष्मण फकीरा लांडगे सरांनी आपल्या भाषणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक  सप्ताह अत्यावश्यक आहे .असे प्रतिपादन  केले. व विद्यार्थ्यांच्या सामाजिक , मानसिक विकासासाठी कला व क्रीडा आवश्यक आहे असे मार्गदर्शन महाविद्यालयास केले.

तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी कवी राजेंद्र सोमवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून सामाजिक बदल कसे होतात याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी साहित्याचा अभ्यास
कसा करावा व साहित्यिक होण्यासाठी कसे प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व मविप्रचे शिक्षण अधिकारी प्राचार्य डॉ.विलास देशमुख होते. तसेच सप्ताह समन्वयक प्रा.
चंद्रप्रभा निकम उपस्थित होत्या.  या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये प्रा. डॉ.घनश्याम जगताप (IQAC Coordinator)यांनी संपूर्ण संस्कृतिक सप्ताहाची माहिती दिली.

या कार्यक्रमात प्रा. डॉ .प्रतिभा पगार , प्रा.डॉ सुनीता जगताप, प्रा प्रतिमा पवार, प्रा. डॉ. सोनल बैरागी, प्रा. डॉ. मनीषा शुक्ल तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली नाईक या विद्यार्थिनी व  आभार प्रदर्शन सुमित बेनके  विद्यार्थी यांनी केले तसेच विद्यार्थ्यांच्या चेतन खोकले, पियुशा सुरवाडे, प्रितेश माळी या टीमने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यानंतर लगेचच काव्यवाचन स्पर्धा, स्टँड अप कॉमेडी व शेरोशायरी च्या स्पर्धा संपन्न झाल्या. परीक्षक म्हणून कवी  राजेंद्र सोमवंशी व प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडी कलाकार , ए. जी .ओ. जी. स्टुडिओचे संचालक अभिजीत गायकवाड यांनी काम पाहिले.